कारूंडे गावचे युवा नेते धनाजीआबा मसुगडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा.
कारूंडे ( बारामती झटका )
कारूंडे गावचे युवा नेते धनाजीआबा गोविंद मसुगडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने कारुंडे गावामध्ये डीएम ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारुंडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून मुलांना शालेय साहित्य वही, पेन वाटप करण्यात आले होते.

तसेच यावेळी मोफत आरोग्य तपासणी करून रक्तदान शिबिर घेण्यात आले. सदर रक्तदान शिबिरामध्ये ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमामध्ये धनाजी मसुगडे, महेश मस्कर, दादासाहेब करे, देविदास रूपनवर, रमेश जाधव, शिक्षण समिती उपाध्यक्ष माऊली मसुगडे, राहुल पाटील, अनिल कापसे, दादा मसुगडे, पोपट मसुगडे, लखन वावरे, भैय्या मसुगडे, प्रविण माने, उमाजी मसुगडे, संतोष मसुगडे, प्रमोद मसुगडे, अमोल चव्हाण, गणेश जाधव, बाळा मस्कर, विजय मसुगडे, अजय मसुगडे, संजय रुपनवर, राजेंद्र मसुगडे, विशाल कापसे, सुधीर रुपनवर, शिवम मस्कर, विष्णु भोसले कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

