राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती
मुंबई (बारामती झटका)
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी शितलताई हगवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून यावेळी प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण, प्रदेश विभागीय अध्यक्ष वैशालीताई नागवडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारतीताई शेवाळे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला पिंपरी चिंचवड जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, संसदपटू खा. सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, पार्थदादा पवार, आ. सुनील अण्णा शेळके व सर्वच पक्षश्रेष्ठींचे शितलताई हगवणे यांनी आभार मानले.
तसेच पक्ष श्रेष्टींनी जी जबाबदारी दिली आहे, त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
