बिहारमधील पटना येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे पटनाच्या जयप्रकाश नारायण विमानतळावर जंगी स्वागत
पटना ( बारामती झटका)
बिहार राज्यातील पटना येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे पटना येथील जयप्रकाश नारायण विमानतळावर बिहार भाजपच्या वतीने जंगी व उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोषजी, राष्ट्रीय महामंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, खासदार उपस्थित राहणार आहेत.


अनेक दिग्गज नेते मंडळीच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्याची मुलूख मैदानी तोफ धडाडणार आहे. माळशिरस विधानसभेचा आवाज बिहार राज्यात घुमणार आहे. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्यावर राम राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

