धानोरे गावात रामभाऊ चषक सिंगल टेनिस बॉल हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरे ता. माळशिरस भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
धानोरे (बारामती झटका)
लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रामभाऊ चषक सिंगल टेनिस बॉल हाफ पीच क्रिकेट स्पर्धा २०२५ या स्पर्धेचे आयोजन आण्णासाहेब देवकाते पाटील यांच्या वतीने शनिवार दि. १/३/२०२५ रोजी सकाळी ९.१५ वा. ग्रामपंचायत शेजारी, धानोरे, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अर्जुन (भाऊ) देवकाते, अग्नीनाथ (भाऊ) चव्हाण, राहुल (भाऊ) माने देशमुख आणि महादेव (भाऊ) कावळे हे परिश्रम घेत आहेत.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने ३०,००१ रु., द्वितीय पारितोषिक भाजपचे युवा नेते सोनूभाऊ पराडे पाटील यांच्या वतीने २०,००१ रु., तृतीय पारितोषिक सुहास (भाऊ) निकम, शरद (भाऊ) चव्हाण, दीपक (भाऊ) चव्हाण यांच्या वतीने १५,००१ रु., चतुर्थ पारितोषिक भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज (भाऊ) पुकळे, नवनाथ (भाऊ) देवकाते यांच्यावतीने १०,००१ रु., पंचम पारितोषिक विशाल (भाऊ) देवकाते यांच्यावतीने ७,५०० रू., सहावे पारितोषिक ज्योतीराम (भाऊ) चव्हाण यांच्या वतीने ५,००० रु. देण्यात येणार आहे.

तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी पिनू (भाऊ) येडगे आणि काका जाधव यांच्याकडून प्रत्येकी ३,००० रु., मॅन ऑफ द मॅच स्वप्नील (भैया) माने देशमुख आणि रणजीत (भाऊ) ठवरे यांच्या वतीने प्रत्येकी ३,००० रु., उत्कृष्ट फलंदाज विनायक (सर) ठवरे आणि रणजीत (भाऊ) भुसारे यांच्या वतीने प्रत्येकी ३,००० रु., उत्कृष्ट गोलंदाज विलास (भाऊ) देवकाते आणि दर्शन (भैया( सुरवसे यांच्या वतीने प्रत्येकी ३,००० रु., सलग पाच षटकार बाळासाहेब पाटील आणि रणजीत (भाऊ) पवार यांच्या वतीने प्रत्येकी ३,००० रु., सलग पाच चौकार राहुल (भाऊ) पद्मन आणि श्रीधर (भाऊ) देशपांडे यांच्या वतीने प्रत्येकी २,००० रु., सलग चार विकेट मदन (भाऊ) माने आणि अशोक (भाऊ) जगदाळे यांच्या वतीने प्रत्येकी २,००० रु., उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रणजीत (भाऊ) चव्हाण आणि संजय (भाऊ) माने यांच्यावतीने प्रत्येकी २,००० रु., उत्कृष्ट कीपर नामदेव (गुरुजी) ढेरे आणि अक्षय (भाऊ) वाघमोडे यांच्या वतीने प्रत्येकी २,००० रु., शिस्तबद्ध संघ महादेव (भाऊ) पवार आणि मामासाहेब भाऊ मगर यांच्या वतीने प्रत्येकी १५,०० रु., तर महादेव (भाऊ) पाटील यांच्या वतीने २,००० रु. बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विशाल देवकते ८०१००६८९४०, प्रतीक देवकते ८२६१८६८२२५, वैभव नाईकनवरे ९८३४०२२१२४, सोमनाथ बनसोडे ९७६६११११८९, आण्णासाहेब देवकाते ७०२०३२१८११ यांच्याशी संपर्क साधून घ्यावी. तरी या भव्य सिंगल टेनिस बॉल हाफ क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट प्रेमींनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.