क्रीडाताज्या बातम्याशैक्षणिक
माळशिरस तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत सुळेवाडी शाळेचे घवघवीत यश

सुळेवाडी (बारामती झटका)
गुरुवार दि. 21/12/2023 रोजी शेरी नं. 2 या ठिकाणी माळशिरस तालुका स्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत लहान गट मुलींमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुळेवाडी (पिलीव बीट) ने घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल सुळेवाडी गावच्या नागरिकांनी विजेत्या संघातील खेळाडूंचे गुलालाच्या उधळणीत व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केले. विजेत्या संघाचे अभिनंदन करून जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.