डॉ. आप्पासाहेब घुटुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांची सातारा जिल्ह्यात क्रेझ होम मिनिस्टर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती…
माण (बारामती झटका)
हिंगणी (ता. माण) येथील युवा उद्योजक डॉ. आप्पासाहेब घुटुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार समारंभ व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे पिलीव जिल्हा परिषद गटाचे सोलापूर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांना बहुमान मिळालेला असल्याने सोलापूर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांची सातारा जिल्ह्यात क्रेझ असून होम मिनिस्टर कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांचा वाढदिवस संयोजन समिती आयोजकांच्या वतीने फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील आबा जाधव, अरुण पवार, प्रमोद भैस, किरण पवार, भीमराव मोरे, संभाजी ढेंबरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. घुटुगडे यांच्या सामाजिक व उद्योजकीय कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धा व कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आनंददायी वातावरणात सहभाग घेण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या मनोरंजनालाही मोठी चालना मिळाली. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्वच कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



