चि. संजय चोरमले आणि चि.सौ.कां. सुप्रिया विरकर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
प्रेषक – भानुदास लक्ष्मण चोरमले, उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका
जळभावी ( बारामती झटका)
स्व. लक्ष्मण गुंडीबा चोरमले यांचे नातू व श्री. सर्जेराव लक्ष्मण चोरमले रा. जळभावी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि श्री. आप्पा महादू विरकर यांची नात व श्री. मोहन आप्पा वीरकर रा. जळभावी यांची ज्येष्ठ सुकन्या सुप्रिया उर्फ विश्रांती यांचा गुरुवार दि. 01/09/2022 रोजी दुपारी 02 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर जळभावी नजीक चोरमले वस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

शाही शुभविवाह सोहळ्यास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन जळभावीचे माजी उपसरपंच श्री. सर्जेराव लक्ष्मण चोरमले व प्रेषक भानुदास लक्ष्मण चोरमले उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यांच्यावतीने करण्यात येत आहे. लग्नाच्या घाई गडबडीत नजर चुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण देण्याचे विसरले अथवा राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन भानुदास लक्ष्मण चोरमले आणि समस्त चोरमले परिवार जळभावी यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
