पिसेवाडी येथील शंभर वर्षाचे केशव सोपान भाकरे यांचे वार्धक्याने दुःखद….

पिसेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच मोहन केशव भाकरे यांना पितृषोक..
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार केशव सोपान भाकरे यांचे शुक्रवार दि. 29/09/2023 रोजी पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, नातवंडे, परतंडे असा परिवार आहे. पिसेवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच मोहन केशव भाकरे यांचे ते वडील होते.
स्वर्गीय केशव सोपान भाकरे यांच्यावर भाकरे वस्ती पिसेवाडी येथे सकाळी साडेनऊ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. केशव भाकरे यांच्या दुःखद निधनाने भाकरे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. भाकरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल व एसकेपी महाराष्ट्र न्यूज यांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng