इस्लामपूर येथील प्रगतशील बागायतदार श्री. आगतराव महादेव पवार यांचे दुःखद निधन…

श्री संभाजी बाबा विद्यालय, इस्लामपूर चे सभापती श्री. रामचंद्र पवार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. लक्ष्मण पवार यांना पितृषोक..
इस्लामपूर (बारामती झटका)
इस्लामपूर गावचे प्रगतशील बागायतदार श्री संभाजी बाबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. आगतराव महादेव पवार यांचे वयाच्या 88 व्या वर्षी बुधवार दि. 16/10/2024 रोजी पहाटे दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. श्री संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूरचे सभापती श्री. रामचंद्र आगतराव पवार व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. लक्ष्मण आगतराव पवार यांचे ते वडील होते. त्यांच्यावर इस्लामपूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम संस्कार त्याच दिवशी दुपारी 11.45 वाजता करण्यात आलेले होते. यावेळी परिसरातील राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातील मान्यवर व इस्लामपूर पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम दि. 18/10/2024 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
स्वर्गीय श्री. आगतराव पवार यांचा सुसंस्कृत स्वभाव असून सर्वांशी मिळून मिसळून असणारे व्यक्तिमत्व अशी ओळख होती. इस्लामपूर गावच्या जडणघडणीत पवार परिवाराचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांच्या दुःखद निधनाने पवार परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय आगतराव पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.