ताज्या बातम्यामनोरंजनसामाजिक

अकलुज फेस्टिवल व कृषी प्रदर्शन 2025 चा उद्या उद्घाटन समारंभ संपन्न होणार

कृषी मंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न

अकलूज (बारामती झटका)

अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शन 2025 चे उदघाटन उद्या गुरुवार दि. 25/12/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय मामा भरणे यांचे हस्ते व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा ना. सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी व जनसेवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या गुरुवार दि. 25/12/2025 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता धवलश्रीराम मंदिर, धनश्रीनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अकलुज फेस्टिवल कृषी प्रदर्शन, आयोजक व संयोजक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom