ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार भरणार…

सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला व्यक्तिगत अडीअडचणी, सार्वजनिक अडचणी, कैफियत मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ, दिवसेंदिवस जनतेचा उदंड प्रतिसाद…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला व्यक्तिगत अडीअडचणी, सार्वजनिक अडचणी व कैफियत मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले असल्याने जनता दरबारास दिवसेंदिवस उदंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवार दि. 06/03/2024 रोजी सकाळी 10.30 वा. माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा जनता दरबार भरणार आहे.

लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी गरीब परिस्थितीमुळे अनुभवलेले आहेत. सर्वसामान्य माणसांना अडचणीत उपयोग व्हावा, माणसांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणी समजावून घेण्याकरता माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबाराची संकल्पना सुरू केली. अनेकांनी शासकीय विश्रामगृह जनता दरबारामध्ये आल्यानंतर पाहिलेले आहे. अनेकांच्या आरोग्याच्या, शिक्षणाच्या व इतर व्यक्तिगत समस्याची कैफियत मांडून समस्या सोडवून घेतलेल्या आहेत.

कामाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना समोरच फोन लावून कामाविषयी सूचना केल्या जातात. जनता दरबारात सर्वसामान्य जनतेला थेट आमदार यांचा संपर्क होत असल्याने दिवसेंदिवस जनता दरबाराला उदंड प्रतिसाद मिळत आहेत. अनेक लोक काम झाले म्हणून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा सन्मान करतात. पेढे देतात, आभार मानण्यासाठी येत असतात.

खऱ्या अर्थाने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य करून गोरगरिबांचे आधारवड बनलेले आहेत. तालुक्यातील जनतेचे कोणत्याच अवयवाचे ऑपरेशन शिल्लक राहिलेले नाही. लाखो रुपयांची ऑपरेशन मोफत करून गोरगरिबांचे व रुग्णांचे आरोग्यदूत बनलेले आहेत. कार्य कर्तुत्ववान व सर्वसामान्य जनतेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारात अनेकजण अडचणी सोडवण्यासाठी लक्ष लावून बसलेले असतात.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Narin ve tatlı, aynı zamanda escort sakarya sakarya arkadaş canlısı ve eğlenceyi seven bir insanım. Her zaman gülümseyen ve çok açık fikirli güzel bir hanımefendiyim. Doğal bir vücudum var, inanılmaz deneyim arayışında iseniz o halde ne arzuladığınızı bana iletebilirsiniz.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort