ताज्या बातम्यासामाजिक

चि. प्रथमेश माने पाटील कन्हेर आणि चि. सौ. कां. शितल वाघमोडे, माळशिरस यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….

प्रेषक
आ. श्री. उत्तमराव शिवदास जानकर.
माळशिरस विधानसभा मतदारसंघ
श्री. गौतम आबा नामदेव माने पाटील.
सदस्य जिल्हा परिषद सोलापूर
श्री. सुभाष एकनाथ माने पाटील
मा. सरपंच कन्हेर ग्रामपंचायत

माळशिरस (बारामती झटका)

स्वर्गीय एकनाथ निवृत्ती माने पाटील यांचे नातू व सौ. वैशाली व श्री. सुभाष एकनाथ माने पाटील रा. कन्हेर, ता. माळशिरस यांचे सुपुत्र कन्हेर गावचे उपसरपंच चि. प्रथमेश माने पाटील आणि स्वर्गीय पांडुरंग माणिकराव वाघमोडे पाटील यांची नात व सौ. मेघा व श्री. निवृत्ती पांडुरंग वाघमोडे, रा. माळशिरस, जि. सोलापूर यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. शितल वाघमोडे यांचा शाही शुभविवाह सोहळा शुक्रवार दि. 19/6/2026 रोजी दुपारी 01 वाजून 31 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, अकलूज रोड, 61 फाटा, माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभकार्यास उपस्थित राहावे, असे माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. उत्तमराव शिवदास जानकर, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य श्री. गौतम आबा नामदेव माने पाटील, कन्हेर गावचे माजी सरपंच श्री. सुभाष एकनाथ माने पाटील व समस्त माने पाटील कन्हेर यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

कार्य सिद्धीस नेण्यास श्रीराम समर्थ आहेत. या आनंदाचे मंगल प्रसंगी आपल्या शुभ आशीर्वाद व शुभेच्छांची आवश्यकता आहे. वधू-वरांच्या सहजीवनाचा शुभारंभ आपल्या उपस्थितीत संपन्न व्हावा, यासाठी विवाह प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्य येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत, असे आपले नम्र सौ. इंदुबाई व श्री. तुकाराम निवृत्ती माने पाटील व समस्त माने पाटील परिवार यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण आहे..

लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस हस्ते परहस्ते नजरचुकीने आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे नजरचुकीने राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे कन्हेर गावचे माजी सरपंच श्री. सुभाष एकनाथ माने पाटील यांच्या वतीने मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांना शुभ कार्यास उपस्थित राहण्याची विनंती आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button