उपअभियंता इस्माईल मुलाणी यांचा माळशिरस तालुका जिल्हा परिषद सेवकांची पतसंस्थेच्या वतीने सन्मान…

माळशिरस (बारामती झटका)
जिल्हा परिषद बांधकाम, उप विभाग माळशिरसच्या उप अभियंता पदी पतसंस्थेचे संस्थापक सभासद मा. श्री. इस्माईल मुलाणी साहेब यांची नियुक्ती झालेबद्दल माळशिरस तालुका जि. प. सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. माळशिरस तर्फे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे संचालक श्री. धन्यकुमार काळे, श्री. रवी पवार व संचालिका श्रीम. मंगल लोहोकरे तसेच पतसंस्थेचे सभासद श्रीम. सरिता शेंडगे, श्री. विजय माळी, श्री. राजेंद्र वाघंबरे, श्रीम. नंदा भोकटे, श्रीम. स्वाती साळवे, श्रीम. सोनाली काळे, श्री. जमीर तांबोळी (शेख), श्री. रसूल मुलाणी, श्री. मौला मुलाणी, श्री. आण्णासाहेब चव्हाण, श्री. सदानंद जाधव, पतसंस्थेचे सचिव श्री. राजेंद्र मिसाळ, शिपाई श्री. बापुराव माने व इतर मान्यवर उपस्थित होते. सदरचा सत्कार समारंभ अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



