कीर्तनकार समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते शिवचरित्र व्याख्याते ह. भ. प. कबीर महाराज आत्तार यांचे दहिगाव येथे सुश्राव्य कीर्तन..

दहिगाव गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्व. जगन्नाथ भगवान मोरे उर्फ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
दहिगाव, ता. माळशिरस गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व स्वर्गीय जगन्नाथ भगवान मोरे उर्फ अण्णा यांच्या प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त बुधवार दि. १४/०१/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते १२.०० या वेळेत कीर्तनकार समाज प्रबोधनकार युवा व्याख्याते शिवशंभू चरित्र व्याख्याते ह. भ. प. कबीर महाराज आत्तार यांचे सुश्राव्य किर्तन शिवप्रसाद दूध डेअरी दहिगाव, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे शिवप्रसाद उद्योग समूह व मोरे परिवार दहिगाव यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
दहिगाव गावामध्ये भगवान मोरे यांना जगन्नाथ, पोपटराव व रामचंद्र अशी तीन मुले. प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसाय व शेतीपूरक व्यवसायातून आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. सौ. जयश्री व श्री. जगन्नाथ यांना शरद, रमेश आणि सुरेखा शिंदे, नीलम जाधव अशी चार अपत्ये आहेत. सौ. रतन व श्री. पोपटराव यांना वैभव व रूपाली मोरे अशी दोन अपत्य आहेत. सौ. जयश्री व श्री. रामचंद्र यांना तेजस व पूजा अशी दोन अपत्य आहेत. आई-वडिलांच्या संस्काराने जगन्नाथ पोपटराव रामचंद्र या त्रिमूर्तींनी समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करून एकत्र कुटुंब पद्धती मोरे परिवार यांच्या चौथ्या पीडित सुद्धा एकोपा व कुटुंबामध्ये एकमेकांविषयी आदर व प्रेम राहिलेले आहे. त्रिमूर्तींच्या परिवारातील शरदबापू यांना ऋतुजा, रमेशराव यांना आश्विनी, वैभव यांना प्रियांका अशा सुसंस्कृत सुना भेटलेल्या आहेत. मोरे परिवारातील कन्या सुद्धा सुसंस्कृत घराण्यामध्ये गेलेल्या आहेत. सुरेखा निलेश शिंदे, नीलम अतुल जाधव, रूपाली अविनाश जाधव अशा घराण्यामध्ये मोरे परिवारांच्या लेकी माहेरचा वसा व वारसा सासरमध्ये जपत आहेत. तेजस व पूजा अविवाहित आहेत. मोरे परिवारांमध्ये प्रथमेश, प्रतीक, ऋषिकेश, श्रेयश, अधिराज, सलोनी, दिव्यांशी, वीरांशी, श्रेया, अनुश्री अशी नातवंडे आहेत.

दहिगावचे मोरे असा उल्लेख केल्यानंतर शिवप्रसाद असे नाव आपोआपच येते. कारण शिवप्रसाद उद्योगाच्या माध्यमातून मोरे परिवार यांनी उद्योग व्यवसायात नाव केलेले आहे. मोरे घराण्याचे संस्कार, व्यवसायामधील प्रामाणिकपणा या जोरावर अनेक उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर आहेत. दुग्ध व्यवसाय, बँक, तेल उद्योग, कन्स्ट्रक्शन असे अनेक व्यवसाय मोरे परिवार यांचे सुरू आहेत. सर्वांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. मात्र घरामध्ये एकोपा व एकमेकांचे विचार आत्मसात करून शिवप्रसाद उद्योगाचा उद्योग व्यवसायामध्ये चढता आलेख राहिलेला आहे.
राजकारणापेक्षा समाजकार्यातून मोरे परिवार यांनी शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून गोरगरीब, दिनदलित व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे काम सुरू आहे.
अशा सुसंस्कृत मोरे परिवार यांच्या घरामध्ये जगन्नाथ मोरे उर्फ अण्णा यांचे दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त शिवप्रसाद उद्योग समूह व मोरे परिवार दहिगाव यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



