ताज्या बातम्यासामाजिक

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन….

अकलूज परिसर धनगर समाज, उन्नती मंडळ अकलूज..

अकलूज (बारामती झटका)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समारंभ 301, अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज यांच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 09.00 वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन जुने पोलीस स्टेशन नजीक नियोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक नजीक मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. गजीढोल नृत्य सादरीकरण होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.

सकाळी 09.30 वाजता महाराजा यशवंतराव होळकर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीत खास आकर्षण महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण केले जाणार आहे. ढोल, ताशा पथक मावळ, हालगी वादन, उंट, घोडेसह पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली जाणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ व समाजबांधव यांनी कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आयोजक अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button