ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा गुरुवारी सोलापूर जिल्हा दौरा जाहीर…..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या स्वागताची मांडवे, श्रीराम बंगला येथे जय्यत तयारी….

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याचा दौरा जाहीर झालेला आहे. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच पालकमंत्री दौऱ्यावर येत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला या ठिकाणी सदिच्छा भेट देणार आहेत. पालकमंत्री ना. जयकुमार गोरे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर आहेत.

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा –
गुरुवार, दि. २३.०१.२०२५ रोजी स.९.०० वा निवासस्थान बोराटवाडी, ता. माण जि. सातारा येथून शासकीय वाहनाने शिखर शिंगणापूर, ता. माण जि. सातारा कडे प्रयाण, स.९.३० वा. शिखर शिंगणापूर, ता. माण येथे आगमन व राखीव. , स.९. ४५ वा. शिखर शिंगणापूर, ता. माण येथून नातेपुते, ता. माळशिरस जि. सोलापूर कडे प्रयाण, स. १०.१५ वा. नातेपुते, येथे आगमन व राखीव., स. १०.३० वा. नातेपुते, येथून मांडवे, ता. माळशिरस कडे प्रयाण., स. १०.४५ वा. मांडवे, येथे आगमन व मा. आ. श्री. राम सातपुते यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स. ११.०० वा. मांडवे, ता. माळशिरस येथून माळशिरस कडे प्रयाण, स. ११.१५ वा. माळशिरस, येथे आगमन व राखीव, स.११.३० वा. माळशिरस, येथून वेळापूर, ता. माळशिरस कडे प्रयाण, स.११.४५ वा. वेळापूर, येथे आगमन व राखीव, दु. १२.०० वा. वेळापूर, असा माळशिरस तालुक्यात दौरा आहे. नातेपुते येथील कार्यकर्त्यांचा सन्मान घेऊन श्रीराम बंगला येथे सदिच्छा भेट देऊन माळशिरस येथील सत्कार स्वीकारून वेळापूर येथे सत्कार स्वीकारून पंढरपूर तालुक्यांमध्ये प्रयाण होणार आहे.

पंढरपूर, ता. पंढरपूर कडे प्रयाण, दु. १२.३० वा. पंढरपूर, येथे आगमन व राखीव, दु. १.१५ वा. पंढरपूर, येथून सोलापूर कडे प्रयाण, दु. २.१५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, दु. ३.२० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर कडे प्रयाण, दु. ३.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आगमन व सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी यांचे समवेत चर्चा व आढावा बैठक (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), सायं. ५.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथून शासकीय विश्रामगृह, सोलापूर कडे प्रयाण, सायं. ५.१० वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव, सायं. ६.००वा. सोलापूर येथून बोराटवाडी, ता. माण जि. सातारा कडे प्रयाण, असा पालकमंत्री यांचा दौरा जाहीर झालेला आहे.

पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दौऱ्याला सुरुवात होत असल्याने महायुतीचे सर्व नेते व कार्यकर्ते स्वागताच्या जय्यत तयारीला लागलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button