चि. ओमकार क्षीरसागर, शेंडेचिंच मळोली आणि चि. सौ. कां. पूनम काळे सुतार, पंढरपूर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

मळोली (बारामती झटका)
स्वर्गीय लक्ष्मण नारायण क्षीरसागर यांचे नातू व सौ. साखराबाई व श्री. विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर सुतार, रा. शेंडेचिंच मळोली, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. ओमकार क्षीरसागर आणि स्वर्गीय पांडुरंग दत्तात्रेय काळे यांची नात व श्री. मनोहर पांडुरंग काळे सुतार, रा. पंढरपूर यांची सुकन्या चि. सौ. कां. पुनम काळे यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 09/05/2026 रोजी दुपारी 12 वाजून 35 मिनिटे या शुभ मुहूर्तावर कलश – कलावती मल्टीपर्पज हॉल मलपे नगर, इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
विवाह एक आनंद सोहळा, एक पवित्र बंधन, आयुष्याच्या वाटेवरचे एक सुंदर वळण, या अनमोल क्षणी हव्या आहेत, आपल्या आशीर्वादाच्या अक्षदा, आपुलकीच्या सुगंधाने दरवरणाऱ्या सदिच्छा, आणि हवीहवीशी वाटणारी आपली उपस्थिती… यासाठीच शब्दांनी गंधित केलेले हे सस्नेह निमंत्रण आपणांस… आपले नम्र सौ. साखराबाई व श्री. विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर आणि समस्त क्षीरसागर परिवार, शेंडेचिंच मळोली यांच्या वतीने शुभ विवाहकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लग्नाच्या घाई गडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे समस्त क्षीरसागर परिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



