माळशिरस नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांना नगर विकास खात्याकडून क्लीनचिट..

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अनहर्तेच्या आदेशाला स्थगितीमुळे कहो दिल से रेश्माताई फिरसे….
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मुंबई यांच्याकडे रेश्माताई सूर्यकांत टेळे सदस्या माळशिरस नगरपंचायत जि. सोलापूर, यांनी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिनियम 1986 मधील कलम 7 अन्वये दि. 23/09/2025 रोजीच्या अनहर्तच्या आदेशाविरोधात दि. 01/10/2025 रोजी शासनाकडे अपील दाखल केलेले होते. सदरच्या अपिल अर्जावर सक्षम प्राधिकारी तथा उपमुख्यमंत्री, तथा नगर विकास मंत्री यांच्याकडे दि. 05/03/2026 रोजी सुनावणी झाली. सदर सुनावणी अंतिम सक्षम प्राधिकारी तथा उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार अंतिम आदेश पारित होईपर्यंत आपल्या दि. 23/9/2025 रोजी च्या आदेशास स्थगिती देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना आदेश दिलेले असून सदर आदेशाच्या प्रती सौ. रेश्माताई सूर्यकांत टेळे व तक्रारदार श्री. विजय बाजीराव देशमुख यांना देण्यात आलेल्या आहेत.
हकीगत अशी श्री. विजय बाजीराव देशमुख रा. माळशिरस, ता. माळशिरस यांनी सौ. रेश्माताई सूर्यकांत टेळे रा. माळशिरस, ता. माळशिरस यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर नगरपरिषद प्रशासन शाखा प्रभारी सह आयुक्त डॉ. योगेश डोके यांनी क्र. 2025/ नपप्रवि/नवी-6/कावि – 444 विवाद अर्ज नं. 2/2022 दि. 23/09/2025 रोजी पत्रान्वये महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 (1) तसेच महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम 1987 चे नियम 6 अन्वये दाखल केलेल्या अर्जावर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. सामनेवाला यांना या आदेशाच्या निकालापासून माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक म्हणून पुढील कालावधीसाठी अनर्ह ठरविण्यात येत आहे, अशी संबंधितांना निकालाची समज द्यावी, असे पत्र देऊन सदरचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी त्यांच्या आदेशाच्या विरोधात नगर विकास खात्याकडून क्लीनचीट मिळालेली आहे. सदरची जागा रिक्त झालेली होती, त्या वेळेला सदरच्या जागेची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झालेली होती. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अनर्हतेच्या आदेशाला स्थगितीमुळे कहो दिल से, रेश्माताई फिरसे.. अशी समर्थकांमधून चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



