संसदीय मैत्री समितीच्या अध्यक्षपदी सुप्रियाताई सुळे तर सदस्यपदी धैर्यशील मोहिते पाटील…

दुधाची तहान ताकावर भागवली तरीसुद्धा मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक तूप पिल्याचं आव आणत आहे..
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या अठराव्या लोकसभेच्या कार्यकाळात भारताने 60 हुन अधिक देशासोबत संसदीय मैत्री समित्यांची स्थापना केलेली आहे. यामध्ये लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांची अध्यक्ष व समिती सदस्य पदावर नियुक्ती केलेली आहे. सिंगापूर सोबतच्या मैत्री समितीची धुरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे तर भारत व संयुक्त अरब अमिराती समितीत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची सदस्य पदी नियुक्ती केलेली आहे. संसदीय मैत्री समितीच्या अध्यक्षपदी सुप्रियाताई सुळे तर सदस्य पदी धैर्यशील मोहिते पाटील यांची नियुक्ती झालेली आहे. दुधाची तहान ताकावर भागवली तरीसुद्धा मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक तूप पिल्याचं आव आणत आहेत, अशी राजकीय वर्तुळामध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे.
सिंगापूर देशासोबत मैत्री समितीच्या अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे आहेत त्यांच्या समवेत समितीमध्ये खासदार डॉ. टी. सुमित, राजेशजी वर्मा, कल्याण बॅनर्जी, हिबी एडन, प्रधान बरूआ जी. के. गोपीनाथजी, डॉ. के. लक्ष्मणजी, अँन्टो अँन्टनीजी, दिग्विजयसिंहजी, तेजवीरसिंह यांचा समावेश आहे. सिंगापूरच्या संसदेशी थेट संवाद आणि अनुभवाची देवाण-घेवाण करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील यात एकूण 11 खासदारांचा समावेश आहे. अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहेत. त्यापैकी भारत आणि संयुक्त अरब अमिराती मैत्री समितीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील सदस्य आहेत. याचेच भांडवल मोहिते पाटील व मोहिते पाटील कार्यकर्ते सोशल मीडियावर करीत आहेत.
थेट पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शहा यांच्याशी सलोख्याचे संबंध जोडून वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टी समवेत आपले दृढ संबंध आहेत, अशा पद्धतीने लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे राजकारण संपुष्टात आलेले असून माळशिरस तालुक्यातसुद्धा लवकरच राजकारण संपुष्टात येईल, अशी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



