श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या नेत्रदिपक यशाची गरुड झेप

श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर, ता. माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत मागासवर्गीय विभागात नेत्रदीपक यश मिळवले आहे.
यामध्ये विद्यालयात कु. शिंदे हर्षदा राजेंद्र ही सर्व प्रथम आली असून तिला 91%गुण मिळाले आहेत. तर दुसरा क्रमांक कु. बेंद्रे श्रीहर्षा सचिन हीला 90.20% गुण मिळाले आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर कु. काळे श्रेया नागनाथ हीला 88%गुण मिळाले आहेत. या तीन मागासवर्गीय विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदास देशमुख, उपाध्यक्षा माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ. शुभांगी रामदास देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज देशमुख, प्राचार्य पां. बा. बनसोडे, पर्यवेक्षक न. ह. अधटराव, क. महाप्रमुख श्री. सु. मा. गवळी, पर्यवेक्षक सि. भा. गुरव, प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, शिक्षक पालक संघ कार्यकारिणी सर्व अधिकारी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने या यशस्वी विद्यार्थिनींचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सोमनाथ भोसले, आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद सरतापे, आरपीआय आठवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष श्रीपूर, आरपीआय आठवले गट शहर शाखेचे अध्यक्ष गणेश सावंत व सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.