शिंगोर्णी येथे सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन…

शिंगोर्णी (बारामती झटका)
शिंगोर्णी, ता. माळशिरस येथे मुंजे परिवाराच्या वतीने नूतन वास्तूचा सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि. ८/९/२०२६ रोजी सकाळी १० वा. ३० मि. या शुभमुहूर्तावर नरळे वस्ती, शिंगोर्णी येथे संपन्न होत आहे. तसेच श्री. हनुमंतराव देवकते नातेपुतेकर या जागरण गोंधळ पार्टीचे जागरण गोंधळ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. संगीता व श्री. नाना राणू मुंजे, सौ. मनीषा व श्री. दादा नाना मुंजे, सौ. ऋतुजा व श्री. सागर नाना मुंजे यांच्या वतीने करण्यात आले आहे
नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मुंजे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



