सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम विनोदाचार्य ह. भ. प. पांडुरंग महाराज उगले, परभणी यांचे भांब येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. गोपाळ शेंडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
भांब (बारामती झटका)
कै. गोपाळ अण्णा शेंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. ९/९/२०२६ रोजी शेंडगे पाटील वस्ती, भांब, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम विनोदाचार्य ह. भ. प. पांडुरंग महाराज उगले, परभणी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती धुरपा गोपाळ शेंडगे, सौ. सारिका व श्री. शशिकांत गोपाळ शेंडगे, सौ. शुभांगी व श्री. सुशांत गोपाळ शेंडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त शेंडगे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



