ताज्या बातम्यासामाजिक

मळोली गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मिरवणूकीत जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन.

पिलीव जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती कार्यक्रम संपन्न होणार..

मळोली (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार दि. 18/02/2026 रोजी सायंकाळी 07 ते 09 या वेळेत शिवशंभू चरित्र कथाकार ह. भ. प. प्रदीप महाराज नलावडे तांबवे सातारा यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. गुरुवार दि. 19/02/2026 रोजी सायंकाळी 05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज व देहू संस्थानचे माजी अध्यक्ष गुरुवर्य ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकरराव नारायणराव जाधव, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी सातारा बाळकृष्ण कदम, वेळापूर पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, विटा पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजीत कणसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

शुक्रवार दि. 20/02/2026 सायंकाळी 07 ते 09 या वेळेत शिवशंभू चरित्रकार ह. भ. प. राहुल शिंदे गुरुजी चापडगाव, अहिल्यानगर यांचे सुश्राव्य व्याख्यान होणार आहे. सदरचा कार्यक्रम मळोली गावातील बालवाडी नं. एक या ठिकाणी होणार आहे. तिन्ही दिवशी रात्री 09 ते 10 या वेळेमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केलेले आहे.

शिवजयंती महोत्सव मळोली 2026 पिलीव जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे समस्त ग्रामस्थ मळोली यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button