Uncategorized

चि.सौ.कां. अंकिता केंगार व चि. अजित तोरणे आणि चि. अजित केंगार व चि.सौ.कां. शिवानी तोरणे यांचा शुभविवाह धूम धडाक्यात संपन्न

अमर बँड बारामती, महाराष्ट्र बँड आटपाडी, सुरसनई पार्टी जांभूड, स्वरनयन आर्केस्ट्रा पुणे यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.

बांगर्डे ( बारामती झटका )

श्री. तात्यासाहेब मारुती केंगार रा. बांगर्डे यांची सुकन्या चि. सौ. कां. अंकिता व स्व. नानासाहेब दगडू तोरणे रा. निमगाव मगराचे यांचे चि. अजित आणि श्री. तात्यासाहेब मारुती केंगार रा. बांगर्डे यांचे चि. अजित व श्री. तानाजी तुळशीराम तोरणे रा. निमगाव मगराचे यांची सुकन्या चि. सौ. कां. शिवानी यांचा शुभविवाह दि‌. 17/11/2022 रोजी दुपारी 01 वाजून 35 मिनिटे या शुभमुहूर्तावर धुमधडाक्यात संपन्न झाला. सदरच्या लग्न सोहळ्यासाठी बारामती येथील सुप्रसिद्ध असणारे अमर बँड व आटपाडी येथील महाराष्ट्र बँड, जांभूड येथील सुरसनई पार्टी हे होते. लग्न सोहळ्याच्या अगोदर व नंतर पुणे येथील सुरनयन आर्केस्ट्रा यांनी बहारदार कार्यक्रम करून उपस्थित नेते मंडळी, वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक, पाहुणे, समस्त बांगर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांना मंत्रमुग्ध केले.

केंगार परिवार बांगर्डे आणि तोरणे परिवार निमगाव मगराचे दोन्ही परिवार होलार समाजासह सर्व जाती धर्माच्या सर्व कार्यक्रमात मिळून मिसळून असतात. त्यामुळे नीरा नदीच्या काठी वसलेले बांगर्डे गाव माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या गावामध्ये लग्न समारंभासाठी निम्म्या महाराष्ट्रातून नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सांगोला, सोलापूर, सातारा, लातूर अशा अनेक मोठमोठ्या शहरातून व तालुक्यातून असंख्य नेते व कार्यकर्ते लग्न समारंभासाठी उपस्थित होते. अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार केंगार, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंजे, उद्योजक सतीश तात्या ढेकळे, उद्योगपती एम.एल. पारसे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, निमगावच्या सरपंच सौ. आरतीताई मगर, युवा नेते दत्ता मगर, बांगर्डे गावचे सरपंच शंकर मेटकरी, उपसरपंच नरहरी चव्हाण, डॉ. ज्ञानदेव ढोबळे सदाशिवनगर, मुंबईचे उद्योजक नितीन हेगडे, पोलीस पाटील विलास मोरे, कृषी अधिकारी पांडुरंग दडस, ॲड. गजानन मदने, रमेश मोरे, कॅप्टन संजय मेटकरी, राजू दादा मेटकरी, महावीर मदने, अशोक वाघमोडे, मारुती मेटकरी, बाळासो टकले, ह.भ.प. ब्रह्मदेव केंगार, लालासो गेजगे, सतीश मेटकरी, अजित रुपनवर, सेवक भाऊ आयवळे, अक्षय भैय्या माने, निवृत्ती गोरे, प्रशांत जाधव, यंग ब्रिगेड अध्यक्ष अभिजीत केंगार, सरदार नामदास, रणजीत तोरणे, मुन्ना ढोबळे, रुपेश आयवळे, बापू दादा ढोबळे, बापूसाहेब आयवळे, मारुती पवार, नानासो मोहिते, गजानन पोटफोटे, राजू मोहिते, जिल्हा परिषद शिक्षक, बांगर्डे पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, नातेवाईक, व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंगार व तोरणे नवदांपत्य यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य उत्तमराव जानकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील, युवा उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, सुनील भजनावळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी सरचिटणीस निर्मलाताई बावीकर, बांगर्डे गावचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच अशोकराव दडस या मान्यवरांनी वधूवरांना शुभ संदेश देऊन वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

सदर लग्न समारंभाचे नियोजन व आयोजन मारुती बाबू केंगार, नानासो मारुती केंगार मेजर, अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष गणेशदादा पोपट केंगार, मुंबई पोलीस परशुराम शंकर केंगार यांनी केलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button