नातेपुते ग्रामीण रूग्णालयात अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण रुग्णांचे प्राण वाचण्यास होणार मदत
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ग्रामीण रुग्णालयास ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत अद्यावत रुग्णवाहिकेची पूर्तता आरोग्यमंत्री डॅा. तानजीराव सावंत व जिल्हासंपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केली असुन माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. या अद्यावत रुग्णवाहिकेचे वाजतगाजत ग्रामीण रूग्णालयात आणून नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे व मान्यवरांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यासाठी महाराष्ट्रातील रुग्णालयांना व्हेंटीलेटरसह सर्व सोयीसुविधांनीयुक्त रुग्णवहिका देण्याचा संकल्प केला होता. सदरची रुग्णवाहिका नातेपुते ग्रामीण रुग्णालयास मिळाली असुन अद्यावत रुग्णवाहिकेमुळे अपघातग्रस्त रुग्णासह इतरांना गरजेनुसार व्हेंटीलेटर सहित इतर सुविधा पुरवित रूग्णालयात पोहचवता येणार आहे. यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
यापुर्वी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नातेपुते ग्रामीण रूग्णालयास सेल काऊंटर, ॲटो ॲनालायजर या दोन्ही मशीन रक्त तपासण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. लोकार्पणावेळी नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, ॲड. भानुदास राऊत, नगरसेवक रावसाहेब पांढरे, पाणी पुरवठा व आरोग्य सभापती रणजीत पांढरे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, डॉ. नरेंद्र कवितके, फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, हनुमंत शिंदे, सतीश बरडकर, समीर शेख, मनोज जाधव, पोपट शिंदे, संतोष गोरे, शशिकांत बरडकर, सिताराम पांढरे, डॉ. प्रणव सातव, हनुमंत माने, जावेद मुलाणी, दादा मुलाणी, हृतिक पिसे, गणेश कांबळे, धीरज नाळे, कन्हैय्या चांगण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng