मनमिळावू स्वभाव असणारे, मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस, स्वकर्तुत्वाने युवकांच्या मनावर अधिराज्य करणारा, दिलदार व्यक्तिमत्वावर शुभेच्छांचा वर्षाव झाला…
नातेपुते ( बारामती झटका )
मनमिळावू स्वभाव असणारे, मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस, स्वकर्तुत्वाने युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे, दिलदार व्यक्तिमत्व तेजस भारत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जननायक मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीचे बांधकाम विभागाचे सभापती अतुलबापू पाटील, उद्योजक अतुलशेठ बावकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, जेष्ठ नेते आप्पासाहेब भांड, युवा नेते रणजितदादा काळे, नगरसेवक रणजीत पांढरे, उद्योजक धनुआबा राऊत, पैलवान सोमनाथ जाधव, पप्पूशेठ दुधाळ, जब्बार मुलाणी, बाबासो बोडरे, सचीन साळी, सतिश ठेंगल, सुरेश ढेकळे, लखन जठार, वैभव सुळ आदी मान्यवरांनी नातेपुते येथील मामासाहेब पांढरे संपर्क कार्यालयात सन्मान केला. दिवसभर मित्र परिवारांच्या शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे.


तेजस पाटील यांचे मुळ गाव सातारा आहे. त्यांचे मामा फोंडशिरस गावातील हणमंतराव पाटील आहेत. प्रतिक्षा भारत पाटील यांना तेजस आणि रणजीत अशी दोन मुले. रणजीत हे इंजिनियर पुर्ण करुन हैदराबाद येथे आयटी पार्कमध्ये स्वाॅप्टवेअर इंजिनियर आहेत. तेजस यांनीही पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तेजस पाटील 2008 साली सातारा जिल्हा सोडून नातेपुते येथे उद्योग व्यवसायानिमित्त आलेले होते. तेजस यांनी बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला.

नातेपुते येथे मामासाहेब पांढरे यांच्याशी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर जननायक मामासाहेब पांढरे यांचे कट्टर समर्थक बनलेले आहेत. मामासाहेबांचा स्वभाव व उद्योग व्यवसायामुळे दोघांचे अतूट नाते बनले. तेजस यांनी मामाश्री प्रतिष्ठानची स्थापना करून युवकांचे जाळे निर्माण केलेले आहे. नातेपुते पंचक्रोशीतील अनेक गावातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली आहे.
संघटन कौशल्य व मनमिळावू स्वभाव असणारे तेजस कमी दिवसांमध्ये मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस अशी त्यांची युवकांच्या मध्ये ओळख झालेली आहे. तेजस यांनी मामासाहेब यांच्या सहकार्याने उद्योग व्यवसायात गगन भरारी घेतलेली आहे. फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथील राजेंद्र चोरमले यांची कन्या मानसी यांच्याशी 2017 साली विवाह झालेला आहे. तेजस पाटील यांनी सातारा वरून मामाच्या गावाला येऊन जननायक मामासाहेब यांच्या सहकार्याने नातेपुते पंचक्रोशीत आर्थिक प्रगती केलेली आहे. नातेपुते येथे जागा विकत घेऊन घराचे काम पूर्ण केलेले आहे. वाढदिवसानिमित्त चार चाकी गाडी खरेदी केलेली आहे.


जननायक मामासाहेब पांढरे यांचा आदर्श व सहकार्य घेऊन समाजामध्ये तेजस पाटील यांनी प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे. नातेपुते शहर व नातेपुते पंचक्रोशीत मित्र परिवारांचा दांडगा संपर्क असल्याने अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फेसबुक, व्हाट्सअप व फोनवरून संपर्क करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अडीचशे ते तीनशे मित्रांनी आपल्या स्टेटसला वाढदिवसाच्या शुभेच्छा ठेवलेल्या आहेत. अशा स्वकर्तुत्वाने व चांगल्या वागणुकीने समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तेजस पाटील यांना श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका यांचेकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

