माजी आमदार बबनदादा शिंदे यांची अकलूज मधील माने पाटील, माने देशमुख परिवार यांनी निवासस्थानी भेट घेतली..

अकलूज (बारामती झटका)
माढा तालुक्याचे भाग्यविधाते माढा विधानसभेचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील अमेरिकेतील शस्त्रक्रिया पूर्ण करून आल्यानंतर निमगाव टेंभुर्णी येथील निवासस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ज्येष्ठ नेते फत्तेसिंह माने पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग भाऊ देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यशवंत उर्फ दादाराजे घाडगे, उद्योजक इनुस नदाफ आदींनी सदिच्छा भेट घेतली.

माळशिरस तालुक्याच्या राजकारणासह जिल्ह्यामध्ये राजकारण करीत असताना माने पाटील व माने देशमुख यांनी नेहमी सकारात्मक राजकारण केलेले आहे. राजकारणापलीकडे राजकीय मैत्री जपण्यामध्ये पहिल्यापासून माने पाटील व माने देशमुख यांनी आपली तालुक्यात व जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कायम नेहमी सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. बबनदादांच्या राजकारणामध्ये माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील 14 गावे माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती. त्यावेळेसचा शिंदे परिवार यांच्याशी माने पाटील व माने देशमुख यांचा राजकीय सलोखा आजही कायम ठेवलेला पाहायला मिळत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



