चि. महेश ताटे देशमुख, संगम आणि चि.सौ.कां. राजनंदिनी देशमुख, टेंभुर्णी यांचा शुभविवाह होणार संपन्न
श्री. अशोकराव माणिकराव ताटे देशमुख आणि श्री. प्रकाश नारायण देशमुख यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार
संगम (बारामती झटका)
कै. माणिकराव कृष्णा ताटे देशमुख यांचे नातू व श्री. अशोकराव माणिकराव ताटे देशमुख, रा. संगम, ता. माळशिरस यांचे चिरंजीव महेश आणि श्री. नारायण हनुमंतराव देशमुख यांची नात व श्री. प्रकाश नारायण देशमुख, रा. टेंभुर्णी, ता. माढा, यांची कन्या चि. सौ. कां. राजनंदिनी यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. १३/६/२०२३ रोजी दुपारी १२ वा. २६ मि. या शुभमुहूर्तावर सद्गुरु कृपा मंगल कार्यालय, संगम चौक, संगम, टेंभुर्णी-अकलूज रोडवर, ता. माळशिरस येथे संपन्न होत आहे.
तरी नववधूवरांस शुभ आशीर्वाद देण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण विठ्ठलराव माणिकराव ताटे देशमुख, चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संगम, माजी सरपंच ग्रामपंचायत संगम, माजी संचालक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी सूतगिरणी अकलूज, पिसेवाडी, यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणास आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे अशी विनंती ताटे देशमुख आणि देशमुख परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng