ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश झाला…

लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या अजितदादांच्या कार्याचा राज्य सरकारने केलेला अधिकृत गौरवच आहे….

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीचा सन २०२६ पासून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा केवळ शासन निर्णय नसून, महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव आहे.

दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते, तर प्रत्येकाच्या हक्काचे ‘दादा’ होते.

यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. दादांच्या लोकसेवेचा, विकासदृष्टीचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.

आदरणीय अजितदादांचे विचार, कार्य आणि विकासाचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

आदरणीय अजितदादांना विनम्र मानवंदना! श्रीनिवास वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील संपादक बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल मु. पो. मळोली ता. माळशिरस जि. सोलापूर 98 50 10 49 14 धन्यवाद….

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button