ताज्या बातम्या
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची स्मार्ट सिटी पुणे येथे बदली….
सोलापूर (बारामती झटका)
राज्यातील आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी आदेशान्वये केलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची स्मार्ट सिटी पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झालेली आहे.
बुलढाणा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असणारे कुलदीप जंगम यांची रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदी निवड झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.