सिताचंद्र पुत्र सुरेश साळुंकेंचा बीड-पुणे संगीत कलाकार मैत्री शोमध्ये सत्कार संपन्न

बीड (बारामती झटका)
महाराष्ट्रभर आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आशय घन ओजस्वी आवाजात निवेदनासाठी प्रसिद्ध असलेले बीडचे सिताचंद्र पुत्र निवेदक सुरेश साळुंके यांचा बीड पुणे कलाकार मैत्री शोमध्ये सत्कार करण्यात आला. बीड येथे सप्तसुर म्युझिक क्लब पुणे आणि निषाद संगीत अकादमी पुणेच्यावतीने बीड येथे जुन्या नव्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक सुरेश साळुंके यांना खास निवेदनासाठी निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात जवळपास वीस कलावंतांनी सदाबहार चाळीस गाणी सादर केली. संपुर्ण शो हसतखेळत ठेवण्यासाठी निवेदक सुरेश साळुंके यांनी गीताच्या अनुषंगाने केलेले निवेदनाने उपस्थित कलारसिकांना खेळवत ठेवले.
प्रत्येक गाण्याच्या पाठीमागच्या आठवणी, गितकाराची प्रतिभेची क्षितिजा पलिकडची प्रगल्भता, शब्दाची जादु, शब्दांनी परिधान केलेले संगीत आणि लता दिदी, महंमद रफिक, किशोरदा, मुकेश, अमित कुमार, एस. पि. बालसुब्रमण्यम या आणि अशा अनेक गायकांच्या परिश्रमाचे संखोल ज्ञान निवेदनातुन पाझरत तर होतेच पण सर्वांच्याच तारुण्यातील आठवणींचे रेश्मी धागे हळुवार आणि मिश्किलपणे उलगडले. निवेदक सुरेश साळुंकेंनी कार्यक्रमात नवरंग भरलेच पण सुप्रसिद्ध लेखक, कवि, नाटककार पत्रकार, प्र. के. अत्रेंनी आपल्या दै. मराठामध्ये “स्वरलता” नावाचा लिहिलेल्या अग्रलेखाचे वाचन करून प्र. के. आत्रेच्या प्रतिभेचे गुलाबजल कला रसिकांवर शिंपडत गीत रसिकांना तृप्त केले……
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



