तरंगफळ येथे मागेल त्याला मोफत फळबाग लागवड करणार – सरपंच नारायण तरंगे

तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ, ता. माळशिरस या गावाने जलसंधारण व वृक्ष संवर्धन यात भरीव कामगिरी केली आहे. त्याचा फायदा संपूर्ण गावाला मिळत आहे. त्यामुळे तरंगफळ गाव पर्यावरण पूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे. त्यासाठी गेली अनेक दिवस गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून से ट्रीज एन्व्हायरमेंटल ट्रस्ट यांच्या सहभागातून तरंगफळ गावात मागेल त्याला फळबाग लागवड करण्यासाठी उच्च प्रतीची रोपे मोफत देणार असे प्रतिपादन तरंगफळ चे सरपंच नारायण तात्या तरंगे यांनी केले.
आज तरंगफळ येथे खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयी पायोनियर कोर्टेवा कंपनी, से ट्रीज, बालाजी फाउंडेशन, तरंगफळ ग्रामपंचायत, एकता शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रकल्प अधिकारी दादासो वाघमोडे, पायोनियर कंपनीचे नरुटे साहेब, आतिश सर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे, ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग नेते गोरख जानकर, खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर तरंगे, शशिकांत साळवे, जयसिंग साळवे, दादा बागाव यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.