ताज्या बातम्याशैक्षणिक

सदाशिवनगर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने स्पर्धा परीक्षेत उतुंग यश मिळविलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान संपन्न

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने स्पर्धा परीक्षेत उतुंग यश मिळविलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. गरीब कुटुंबातील परिस्थीतीवर मात करून आई वडीलांच्या इच्छा पुर्ण करण्याचे काम या मुलांनी केले आहे. जि. प प्राथमिक शाळा सदाशिवनगर व कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर या शाळेत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळविले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सरपंच विरकुमार दोशी, जिल्हाअध्यक्ष सोमनाथ भोसले, सदस्य गोरक्षनाथ (दादा) पालवे, तानाजी ओवाळ, विष्णु भोंगळेसर, अमोल धाईंजे, मदन सुळे, लालखान पठाण, दत्ता भोसले, संतोष दाभाडे, जगताप सर, गणेश ओवाळ, सोपान नाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी यशस्वी अधिकारी संदीप सदानंद कुंभार IAS अधिकारी, मारुती गणेश ओवाळ कृषी मंडळ अधिकारी, शुभम कुंडलिक शिंदे कनिष्ठ अभियंता, मयुर बाळासाहेब सुळे PSI, रोहित राजकुमार सोनटक्के PSI, रणधीर प्रल्हाद कर्चे PSI, शिवम तुकाराम नाळे CA, मनोज बाबा गजरे मुंबई पोलिस, विजयश्री साईप्रसाद बनकर मुंबई पोलिस, संस्कृती सचीन जठार नवोदय विद्यालय येथे निवड या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort