पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत गुरूंना सन्मान देणाऱ्या शिवनेरी दहीहंडी उत्सव 2026 होणार संपन्न…

शिवराज पुकळे युवाशक्ती आयोजित भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे आणि पिलीव पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता पुकळे यांच्या वतीने आयोजन…
पिलीव (बारामती झटका)
शिवराज पुकळे युवाशक्ती आयोजित गुरूंना सन्मान देणाऱ्या शिवनेरी दहीहंडी उत्सव 2026 या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे आणि पिलीव पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता शिवराज पुकळे यांच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत शनिवार दि. १२/९/२०२६ रोजी सायंकाळी ६ वा. आर्वे मैदान, पिलीव, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. गुरुजनांचा सन्मान देणाऱ्या या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन सर्व गुरुजनांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या उत्सवामधील पहिले पारितोषिक रणजीतदादा समर्थक भैय्यासाहेब मोरे व शाखाभाऊ कर्चे यांच्या वतीने १,११,१११ रु., आकर्षक बक्षीस धनाजी (भाई) सुळे आगरी सेना शहराध्यक्ष विरार मुंबई, पै. बाबासाहेब पुकळे चेअरमन, चांदापुरी आणि अण्णासाहेब सुळ पाटील चेअरमन, जनसेवा उद्योग समूह यांच्या वतीने ७७,७७७ रू., प्रोत्साहनपर बक्षीस रमेश भाऊ सरवदे भाजपा नेते पिलीव शहर, वरूणदादा धाईंजे युवा मोर्चा माळशिरस शहराध्यक्ष यांच्या वतीने ५५,५५५ रू. देण्यात येणार आहे.

या दहीहंडी उत्सवाची लॉडली डीजे, पेपर ब्लास्ट, प्राईम ऑडिओ, एम के लाईट पंढरपूर, क्रेन सर्विस, सांगोला आणि साई एलईडी स्क्रीन ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत. तसेच दिपाली पुणेकर व ग्रुप आणि निशा मुंबईकर व ग्रुप यांच्या बहारदार नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उत्सवाचे निवेदन माणदेशी निवेदक आवाजाचा बादशहा लखनराज खांडेकर हे करणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



