ताज्या बातम्याराजकारण

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार गटाचा राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याचे वेळापूर येथे आयोजन…

महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार…

वेळापूर (बारामती झटका)

माजी केंद्रीय कृषिमंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार गटाचा राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत वेळापूर ता. माळशिरस येथे दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दु. १ वाजता वेळापूर-माळशिरस रोडवरील इंद्रनील मंगल कार्यालय येथे होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजितदादा पवार यांच्या समवेत राष्ट्रवादीतील नेतेमंडळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दौरा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा होत असल्याने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील कोणत्या विषयावर मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करतील, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सदरचा मेळावा यशस्वी करण्याकरता राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button