माळशिरस शहराच्या वैभवात भर घालणारे हॉटेल ‘नंदनवन’चा उद्घाटन समारंभ संपन्न होणार

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषिमंत्री दत्तात्रयमामा भरणे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ होणार
माळशिरस (बारामती झटका)
‘हॉटेल नंदनवन’ या भव्य हॉटेलचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 25/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता, अकलूज रोड, 61 फाटा, अक्षता मंगल कार्यालय शेजारी, माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बार्शी विधानसभेचे आमदार दिलीप सोपल, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम, विधान परिषदेचे माजी आमदार आर. जी. रुपनवर, अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार आदी मान्यवर असणार आहेत.

तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दादासाहेब बापूराव देशमुख, तुकाराम रामचंद्र देशमुख, राहुल नागनाथ पुरवंत, हनुमंत बापूराव देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



