राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी गोरडवाडीचे माजी सरपंच भागवत कर्णवर पाटील यांचा सन्मान केला.
माळशिरस ( बारामती झटका )
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी गोरडवाडी गावचे माजी सरपंच व गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भागवत कर्णवर पाटील यांचा वाढदिवसानिमित्त माळशिरस येथील यशोदा निवास येथील संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मांडकी गावचे माजी सरपंच वस्ताद तानाजी रणनवरे सर, भांबुर्डीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब वाघमोडे, भांबुर्डी गावचे विद्यमान उपसरपंच आप्पासाहेब वाघमोडे, गोरडवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पांडुरंग पिसे, पैलवान कालिदास रुपनवर, भाऊ गारुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावागावात व वाड्या वस्त्यांवर जनसंपर्क वाढविलेला आहे. सर्वसामान्य व तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोचविण्याचे त्यांचे काम सुरू आहे. समाजामध्ये वावरत असताना बाबासाहेब माने पाटील यांचा जनतेच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी सहभाग असतो. हितचिंतकांच्या वाढदिवसाला ते आठवणीने शुभेच्छा देत असतात. अनेकांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवीत असतात. गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते भागवत कर्णवर पाटील यांचा माळशिरस येथील संपर्क कार्यालयावर सन्मान केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very engaging and funny! For more information, visit: EXPLORE FURTHER. Let’s chat!