शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या एकविसाव्या ऊस परिषदेची माळशिरस तालुक्यात जय्यत तयारी.
माळशिरस ( बारामती झटका )
अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांचे दैवत शेतकऱ्यांचे खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथे 21 वी ऊस परिषद आहे. सदरच्या ऊस परिषदेसाठी शेतकरी बांधव व ऊस उत्पादक सभासद यांच्या गावागावात बांधा बांधावर जाऊन माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुका ढवळून काढलेला आहे. परिषदेसाठी माळशिरस तालुक्यातून कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केलेली आहे.


माळशिरस तालुक्यात स्वाभिमानीची चळवळ उभी करणारे शिलेदार माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, विधानसभा प्रमुख साहिल आतार, पिसेवाडी गावचे बापूसाहेब कोरटे, दादासाहेब म्हेत्रे, शिवाजी वाघमारे व तरुण वर्गातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

