चि. सचिन गोरड व चि.सौ.कां. वैशाली वाघमोडे, चि. आप्पासो यमगर पाटील व चि.सौ.कां. प्रीती मारकड, चि. निलेश गोरड व चि.सौ.कां. आरती विरकर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
श्री. भगवान गोरड गोरडवाडी आणि श्री. विठ्ठल वाघमोडे जाधववाडी, श्री. यशवंत यमगर पाटील, गोरडवाडी, आणि श्री. बापूराव मारकड चाकाटी, श्री. तानाजी गोरड गोरडवाडी आणि श्री. भीमराव विरकर कचरेवाडी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत बांधले जाणार.
गोरडवाडी ( बारामती झटका )
स्व. निवृत्ती संतु गोरड यांचे नातू व श्री. भगवान निवृत्ती गोरड रा. गोरडवाडी यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन गोरड आणि स्व. दगडू संतु वाघमोडे यांची नात व श्री. विठ्ठल दगडू वाघमोडे रा. जाधववाडी यांची कनिष्ठ सुकन्या चि.सौ.कां. वैशाली वाघमोडे यांचा तसेच स्व. सुखदेव कृष्णा यमगर पाटील यांचे नातू व श्री. यशवंत सुखदेव यमगर पाटील रा. गोरडवाडी यांचे कनिष्ठ चिरंजीव आप्पासाहेब यमगर पाटील आणि श्री. अंकुश पांडुरंग मारकड यांची नात व श्री. बापूराव अंकुश मारकड रा. चाकाटी यांची द्वितीय सुकन्या चि.सौ.कां. प्रीती मारकड यांचा तसेच स्व. खुमाजी जगन्नाथ गोरड यांचे नातू व श्री. तानाजी खोमाजी गोरड रा. गोरडवाडी यांचे कनिष्ठ चिरंजीव निलेश गोरड आणि श्री. भीमराव पंढरीनाथ विरकर रा. कचरेवाडी यांची सुकन्या चि.सौ.कां. आरती वीरकर यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 27/11/2022 रोजी सायंकाळी 06 वाजून 10 मिनिटे या गोरज सुमूर्तावर गोरडवाडी नजीक पांढरे देऊळ येथे संपन्न होणार आहे.


तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रेषक बाबासाहेब भाऊसाहेब वाघमोडे प्रांताधिकारी गडहिंग्लज, श्री. बाळासाहेब नानासो कर्णवर पाटील व्हाईस चेअरमन श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी, श्री सोमनाथ तुकाराम कर्णवर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर, श्री. राजेंद्र कुमार तुकाराम गोरड सर, श्री. संजय आण्णा बाबुराव मोटे कॉन्ट्रॅक्टर, श्री. यशवंत सुखदेव यमगर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य गोरडवाडी, श्री. शंकर विठ्ठल यमगर पाटील उपसरपंच गोरडवाडी, श्री. मच्छिंद्र शिवाजी गोरड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा, श्री. भीमराव खुमा गोरड, श्री. राहुल तानाजी गोरड यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे. नजर चुकीने आपणास आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे गोरड, वाघमोडे, यमगर पाटील, मारकड विरकर परिवारांच्या वतीने नम्र विनंती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
