बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेना तालुका अध्यक्ष बापूराव सरक यांच्या वाढदिवसाला सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे आयोजन.
वाढदिवसानिमित्त समाजामधील गोरगरीब व गरजू लोकांना पंधरा लाखाचे सामाजिक बांधिलकी जपत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्ष बापूराव विठ्ठल सरक उर्फ बापूराव यांचा वाढदिवस दि. १ डिसेंबर रोजी असतो. त्यानिमित्त रविवार दि. ०४/१२/२०२२ रोजी सायंकाळी समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना सामाजिक बांधिलकी जपत साहित्य वाटपाचा कार्यक्रम जाधववाडी व भांबुर्डी गावच्या सीमेवर असणारे नाथ मंदिर येथे संपन्न होणार आहे. उपस्थित सर्व मान्यवर व समाजातील गरजू व्यक्तींना स्नेहभोजनाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका युवा सेना व बापूराव (आप्पा) सरक मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित केलेला आहे.
भांबुर्डी गावचे थोर सुपुत्र व बाळासाहेबांची शिवसेना युवा सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बापूराव सरक यांनी वाढदिवसाला वायपट पैसा खर्च न करता समाजामधील गरजू व्यक्तींना फायदा व्हावा, असा उदात्त हेतू ठेवून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. भांबुर्डी पंचक्रोशीतील सदाशिवनगर, जाधववाडी, पुरंदावडे, येळीव, मेडद, गोरडवाडी, तरंगफळ, मांडवे आदी गावातील गरजू व्यक्तींना पंधरा लाखाचे साहित्य त्यामध्ये तीन चाकी सायकल, कानातील मिशन, व्हीलचेअर, काठी, वॉकर अशा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी संबंधित गावातील गरजू व्यक्तींनी बापूराव सरक उर्फ आप्पा यांना ९७६६७७५००९, सचिन (दादा) वाघमोडे ९७३०४५१५१६, धुळदेव शिंदे ९९७०६५९३९०, भारत वाघमोडे ७७५६९४२३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माळशिरस तालुका युवा सेना व बापूराव (आप्पा) सरक मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
It’s very interesting! If you need help, look here: hitman agency
Excellent content! The way you explained the topic is impressive. For further details, I recommend this link: EXPLORE FURTHER. What do you all think?
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.