चि. पंकज एकतपुरे चौंडेश्वरवाडी अकलूज आणि चि.सौ.कां. अश्विनी गोरे फोंडशिरस यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार.
श्री. दशरथ बाबुराव एकतपुरे उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग अकलूज त्यांच्यावतीने उपस्थित राहण्याचे आवाहन
अकलूज ( बारामती झटका )
स्व. बाबुरावभाऊ एकतपुरे यांचे नातू व श्री. दशरथ बाबुराव एकतपुरे रा. चौंडेश्वरवाडी, अकलूज, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव आणि स्व. रामचंद्र राघू गोरे यांची नात व श्री. देवदास रामचंद्र गोरे रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांची द्वितीय सुकन्या चि.सौ.कां. अश्विनी यांचा शुभ विवाह शुक्रवार दि. 09/12/2022 रोजी सायंकाळी 05 वाजून 50 मिनिटे या शुभ गोरज मुहूर्तावर आनंदी गणेश मंगल कार्यालय आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे शुभविवाह आयोजित केलेला आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह मंगल कार्यास उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग अकलूज श्री. दशरथ बाबुराव एकतपुरे आणि समस्त एकतपुरे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.


लग्नाच्या घाई गडबडीत नातेवाईक व मित्रपरिवार यांना आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे हस्ते परहस्ते प्रयत्न केलेला आहे. मात्र, नजरचुकीने राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे श्री. दशरथ एकतपुरे आणि समस्त एकतपुरे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

