चि. प्रसाद ढवळे आणि चि.सौ.कां. किरण काळे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न
श्री. राजेंद्र ढवळे, चाकोरे आणि श्री. व्यंकटराव काळे, तुळजापूर यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत घट्ट होणार
चाकोरे (बारामती झटका)
सौ. प्रभावती व श्री. राजेंद्र महादेव ढवळे रा. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे चिरंजीव प्रसाद आणि सौ. देवशाला व श्री. व्यंकटराव रघुनाथ काळे रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांची सुकन्या चि.सौ.कां. किरण यांचा शुभविवाह बुधवार दि. १८/१/२०२३ रोजी दुपारी १.४५ वा. या शुभ मुहूर्तावर गुरुकृपा मंगल कार्यालय, तांबवे पाटी, अकलूज-टेंभुर्णी रोडवर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन ढवळे आणि काळे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण देण्यास राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून लग्न कार्यास उपस्थित रहावे, असे आवाहन ढवळे परिवारांच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng