उपासक आकाश सावंत आणि उपासिका मधुलिका नवघरे यांचा मंगल परिणय होणार संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
आयु. रतनबाई व कालकथित उद्धव धोंडी सावंत यांचे नातू व आयु. लक्ष्मी व कालकथित भीमराव उद्धव सावंत (जिल्हा परिषद सदस्य), रा. माळशिरस, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ चिरंजीव उपासक आकाश (नगरसेवक) आणि कालकथित कमल व नेमचंद नवघरे यांची नात व कालकथित वृषाली व प्रवीण नवघरे रा. आलेगाव, ता. सांगोला यांची जेष्ठ सुकन्या उपासिका मधुलिका (सहप्राध्यापिका) यांचा मंगल परिणय गुरुवार दि २६/१/२०२३ रोजी दु. २.१५ वाजता अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

या मंगल परिणय सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका ॲड. संजीवनीताई सुभाष पाटील, आरपीआयचे आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे असणार आहेत.
तरी या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून उपासक आणि उपासिका यांना शुभाशीर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती सावंत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
