चि. पृथ्वीराज वाघमोडे पाटील आणि चि.सौ.कां. तृप्ती काळे पाटील यांचा शुभविवाह सोहळा संपन्न होणार.
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी गावचे वाघमोडे पाटील आणि माण तालुक्यातील आंधळी मलवडी गावचे काळे पाटील विवाह बंधनाच्या रेशीमगाठीत होणार विवाहबद्ध.
माळशिरस (बारामती झटका)
श्री. नारायण भाऊ वाघमोडे पाटील यांचे नातू व सौ. पुष्पांजली व श्री. देविदास नारायण वाघमोडे पाटील (माजी सरपंच) रा. भांबुर्डी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव पृथ्वीराज आणि श्री. नामदेव भानजी काळे पाटील यांची नात व सौ. नीता व श्री. भगवान नामदेव काळे पाटील रा. आंधळी मलवडी, ता. माण यांची सुकन्या चि.सौ.कां. तृप्ती यांचा शाही विवाह सोहळा शुक्रवार दि. २७/१/२०२३ रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटे या शुभमुहूर्तावर आंधळी मलवडी, चावर वस्ती, काळे मळा, आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थाना शेजारी ता. माण, जि. सातारा येथे संपन्न होणार आहे.
सदर शाही शुभविवाह सोहळ्याचे प्रेक्षक आमदार गोपीचंद पडळकर, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच गणपतराव बाबुराव वाघमोडे पाटील, पोलीस अधीक्षक पालघर श्री. बाळासाहेब भानुदास वाघमोडे पाटील, कोल्हापूर उपजिल्हाधिकारी श्री. बाबासाहेब भाऊसाहेब वाघमोडे पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीराम विठ्ठल पालवे (जावई), श्री. ॲड. भगवान अण्णा वाघमोडे पाटील, भांबुर्डीचे माजी सरपंच श्री. बळवंत गेणू वाघमोडे पाटील, भांबुर्डीचे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जनक जयवंतराव वाघमोडे पाटील, व्हाईस चेअरमन श्री. शंकर यशवंत वाघमोडे पाटील, सरपंच महादेव केसू वाघमोडे पाटील आणि समस्त वाघमोडे पाटील भांबुर्डी यांच्या वतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे व कळकळीचे आमंत्रण आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng