माळशिरस तालुक्यात वाळू तस्करांनी डोके वर काढले पुन्हा तस्करांचा धुडगूस सुरू झाला….
प्रांताधिकारी, तहसीलदार प्रभारी, अवैध वाळू तस्कर कारभारी, पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे यांनी स्टिंग ऑपरेशन करणे गरजेचे आहे…
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात वाळू तस्कर यांनी डोके वर काढलेले असून पुन्हा एकदा तालुक्यात वाळू तस्करांचा धुडगूस सुरू झालेला आहे. अकलूज उपविभागीय कार्यालयाचे प्रांताधिकारी व माळशिरस तहसील कार्यालयाचे तहसीलदार दोन्हीही पदे प्रभारी असल्याने अवैध वाळू तस्करी करणारे कारभारी झालेले आहेत. अकलूज पोलीस उप विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी स्टिंग ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे.
माळशिरस तालुक्यात सध्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार हे दोन्हीही जबाबदार अधिकारी नाहीत. दोन्हीही ठिकाणी प्रभारी पदभार असल्याने मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावरील महसूल प्रशासनाची पकड ढिली झालेली आहे. राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध असल्याने डोळेझाक होत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमधून येत आहे. सोलापूर ग्रामीणच्या लेडी सिंघम म्हणून ओळख असणाऱ्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी अवैध वाळू उपसा तस्करी करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळलेल्या होत्या. सध्या सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे जबाबदारी आहे. माळशिरस तालुक्यासाठी अकलूज, वेळापूर, माळशिरस, नातेपुते अशी चार पोलीस स्टेशन व अनेक ठिकाणी आउट पोस्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासनाचा कर्मचारी वर्ग तैनात आहे, तरीसुद्धा, अवैध वाळू उपसा होत आहे. महसूल व पोलीस प्रशासन डोळेझाक का करीत आहे ? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.
यासाठी माळशिरस उपविभागाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी स्टिंग ऑपरेशन करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळाव्या अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ओढे, नाले, बंधारे, तलाव या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल प्रशासन प्रभारी झालेले असल्याने वाळू तस्कर कारभारी झालेले आहेत. फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनच अवैध वाळू उपसा रोखू शकते ? का ते सुद्धा हतबल होते ? याकडे जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?