माढा लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय रस्ते निधी योजनेतून ५५ कोटी ८७ लाखांचा भरघोस निधी – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
माढा (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदारसंघासाठी कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाला व जिल्हा महामार्गाला जोडले जाणाऱ्या रस्त्यासाठी सातत्याने पत्राद्वारे व समक्ष भेटून निधीची (CRF) मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुचवलेल्या मागणीनुसार रस्त्यांच्या कामाची यादी पत्राद्वारे मंजूर केली आहे.
त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील १) वेळापूर तांदूळवाडी एमडीआर २०८ यासाठी ४.९०कोटी २) अकलूज ते वेळापूर रस्त्यासाठी १६ कोटी ६६ लाख रुपये, ३) माण तालुक्यातील वडजल येथे पूल बांधणे यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये, ४) माण गंगा नदीवर टाकेवाडी, पांगरी, वावरहिरे, आनंद, पळशी, पिंपरी येथे पूल बांधणे ७ कोटी ८४ लाख, ५) कुरवली, मांडवखडक, दालवडी, उपळवे, कुरोली रोड एमडीआर ६७ या रस्त्यासाठी २४ कोटी ५१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
यामुळे या परिसरातील दळणवळणास चालना मिळेल व रस्ते चांगल्या पद्धतीने होतील यासाठी ५५ कोटी ८७ लाख रक्कम मंजूर झाले आहेत. मतदार संघासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विविध पद्धतीने विकासकामांसाठी सातत्याने झटत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे मतदार संघातील अनेक विकास कामे मार्गी लागलेली आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
can you buy priligy online When ovulation is disrupted, conception is not likely to happen