ज्येष्ठ पत्रकार नरसिंहराव चिवटे यांचा एस. एम. देशमुख यांच्याहस्ते सत्कार
सन 2025 चे मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन करमाळ्यात घेण्याची मागणी
करमाळा (बारामती झटका)
ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांनी पत्रकार क्षेत्रात दिलेले योगदान लक्षणीय असून बिहार राज्यात पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेला कायदा रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात नरसिंह चिवटे यांना दहा दिवस जेल भोगावी लागली होती. असे जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार नवीन पिढीला आदर्श ठरतील, असे मत मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
कर्जत जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार तथा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सचिन जवेरी, पत्रकार नागेश शेंडगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक रोहित वायबसे, कर्जतचे जेष्ठ पत्रकार संतराम सुळ आदी जण उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना एस. एम. देशमुख म्हणाले, गेली 40 वर्षापासून मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनेत चिवटे हे कार्यरत असून येणाऱ्या काळात करमाळ्यात मोठी राज्यस्तरीय शिबिर घेऊ असे सांगितले.
यावेळी बोलताना नरसिंग चिवटे यांनी 2025 चे राज्यस्तरीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन करमाळ्यात घ्यावी, त्याचे आयोजन आम्ही करण्यास व करमाळा तालुका पत्रकार संघ ते यशस्वी करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी या मागणीचा विचार करू सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Monitoruj telefon z dowolnego miejsca i zobacz, co dzieje się na telefonie docelowym. Będziesz mógł monitorować i przechowywać dzienniki połączeń, wiadomości, działania społecznościowe, obrazy, filmy, WhatsApp i więcej. Monitorowanie w czasie rzeczywistym telefonów, nie jest wymagana wiedza techniczna, nie jest wymagane rootowanie. https://www.mycellspy.com/pl/tutorials/