धैर्यशील मोहिते पाटील यांनी निष्ठावान मित्राच्या मैत्रीचे अनोखे दर्शन पहावयास मिळाले.
श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या पुराणातील मैत्रीला उजाळा मिळालेला आहे.
अकलूज ( बारामती झटका )
शिवामृत दूध संघाचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री भाजपचे नेते धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये असणारे निष्ठावान मित्र शिवामृत दूध संघाचे संचालक सचिन दत्तात्रय रणवरे यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस करून लवकर बरे होण्याचे आशीर्वाद दिलेला असल्याने निष्ठावान मित्राच्या मैत्रीचे अनोखे दर्शन पाहावयास मिळालेले आहे. श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीचे पुराणांमध्ये सांगितले जाते त्या दोघांच्या पुरानातील मैत्रीचा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उजाळा दिलेला आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि मांडकी येथील रणवरे इनामदार यांचे तीन पिढ्याचे सलोख्याचे व राजकीय संबंध आहेत तिसऱ्या पिढीमधील धैर्यशील मोहिते पाटील व सचिन रणवरे इनामदार यांचे राजकारणाबरोबर मैत्रीचे नाते आहे. कायम दोघेही सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सानिध्यामध्ये असतात सचिन रणवरे यांना अचानक रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती राजकारणातील चाणक्य असणारे धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीमध्ये व्यस्त होते मतदान झाल्यानंतर मित्राला आवर्जून दवाखान्यांमध्ये भेटण्यास गेलेले होते. मैत्रीचे अतूट नाते जपलेले असल्याने मैत्रीचे अनोखे दर्शन पाहावयास मिळत आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा उजाळा मिळालेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng