Uncategorized
डॉ. दीपाली घोळवे हिचे दुःखद निधन
बार्शी (बारामती झटका)
बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथील रहिवाशी कु. दीपाली घोळवे वय २५ हिचे ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. घोळवेवाडी येथील श्री. बाबुराव घोळवे यांची दीपाली ही कन्या होती. इस्लामपूर येथून तिने नुकतेच बीएएमएस चे शिक्षण पूर्ण केले होते. घोळवेवाडी येथील ती पहिली डॉक्टर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बार्शी तालुक्यातील आगळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ रुग्ण सेवा केली. एक उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्ह्णून डॉ. दीपाली हीने परिसरात नाव मिळविले होते.
डॉ. दीपाली घोळवे हिच्या पश्चात प्राथमिक शिक्षक असलेले वडील, आई, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng