इम्रानखान पठाण, पठाणवस्ती आणि अफिराह पठाण, पठाणवस्ती यांचा शुभविवाह होणार संपन्न
ज. हारूणखान हा. महीमुदखान पठाण आणि ज. मोहनखान इस्माईलखान पठाण यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात बांधल्या जाणार…
पठाणवस्ती (बारामती झटका)
ज. हारूणखान हा. महीमुदखान पठाण, पठाणवस्ती, ता. माळशिरस, यांचे चिरंजीव इमरान खान आणि ज. मोहनखान इस्माईलखान पठाण, पठाणवस्ती, ता. माळशिरस यांची सुकन्या अफिराह (फरहद) यांचा शुभविवाह रविवार दि. १४/५/२०२३ रोजी सकाळी १० वा ४५ मि. या शुभ मुहूर्तावर स्मृतीभवन अकलूज, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
या मंगल प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे आवाहन ज. नईमखान हा. महमुदखान पठाण प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य आणि ज. एजाज फैजखान पठाण, सरपंच ग्रामपंचायत पठाणवस्ती यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट पै-पाहुणे यांनी येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन पठाण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent insights! Your breakdown of the topic is clear and concise. For further reading, check out this link: READ MORE. Let’s discuss!
Ищите в гугле